रोहा : रूपेश रटाटे
मागच्या काही दिवसापूर्वी कुणबी समाजाच्या इमारत भूमिपूजन सोहळ्याला केलेले वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी खरे करून दाखविले का..? तटकरे आणि रोहा तालुक्यातील राजकारण म्हणजे एकहाती सत्ता हा आजवरचा इतिहास कोणी नाकारूच शकत नाही. मात्र राज्यातील सतत बदलत राहणारे राजकारण कुठे तरी जिल्ह्याला आणि तालुक्याला वेगळी कलाटणी देणार का…? असे वाटत होते. तर बदलत्या राजकारणामुळे जिल्हा जिल्ह्यामध्ये , तालुक्या तालुक्यामधील कार्यकर्त्यामध्ये फूट पडताना सर्वत्र दिसून येत होते. अशातच रोहा तालुक्यामध्ये मागच्या काही महिन्यामध्ये ‘कभी खुशी कभी गम’ असे चित्र पहावयास मिळत होते. एका बाजूला तटकरे यांच्या नावाने कधी उबाठा गट नाव घेत विरोध दर्शवत होते. तर सतेत्त असलेले त्रिकुट सरकारमधील शिंदे गट आणि आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये खटके सुध्दा उडताना दिसून आले होते. तर तालुक्यामधील भाजप नेतृत्व पायाभूत सुविधा मिळाव्यात म्हणून संघर्ष करून सावध भूमिका घेत तटकरे यांना कुठे तरी कोंडीत पकडण्याचे पाहू पाहत होते.

मात्र हे तिन्ही पक्ष तालुक्या मध्ये काही काळापासून एकत्रित येताना दिसून येत नव्हते. मात्र एका मुलाखती दरम्यान पत्रकार रुपेश रटाटे यांनी विचारलेला प्रश्न नेमकं काय होता..? तर राज्यात त्रिकुट सरकार स्थापन झाल्या नंतर तालुक्यामधील तिन्ही पक्ष आत्तापर्यंत कोणत्याच कार्यक्रम, उद्घाटन प्रसंगी एकत्रित दिसून येत नाही,यावर तुमची प्रतिक्रिया नेमकी काय ..?काल झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यक्रमाच्या नवीन विश्रामगृह बांधकाम भूमिपूजन सोहळा आणि श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील काही वायरल फोटोमुळे विविध चर्चाना आत्ता उधाण आले असेल तरी तटकरे यांनी मनावर घेतलं तर काही करू शकतात, हे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर काळच्या कार्यक्रमातील फोटो बरंच काही सांगून जातात. परंतु रोहा तालुक्यातील चालू असलेल्या चर्चा ना तटकरे यांनी सध्या तरी पूर्ण विराम लावलेला आहे का…? असा देखील प्रश्न चिन्ह उपस्थित होतोय.

दरम्यान, याविषयी सुनील तटकरे उत्तर देताना म्हणाले की, राज्यात महायुती सरकार स्थापन आहे. राज्यपातळीवर आमची समन्वय समिती आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विविध पक्षाचे नेते मंत्री त्या समिती मध्ये काम करीत आहोत.त्या मुळे जिल्ह्यातील आणि तालुका पातळीवर तिन्ही पक्षांची समन्वय समिती तयार करून लवकरच पुढील बैठका ,कार्यक्रम आम्ही घेऊ असे सांगत ,आमचे मनोमिलन आहे आणि ते अधिक कसे मजबूत होईल हे सांगायला सुद्धा तटकरे विसरले नाही. त्या मुळे येणाऱ्या निवडणुकी मध्ये विरोधी पक्षातील नेते काय भूमिका घेणार..?? हे पाहायला मिळणार .. तर महायुती मध्ये तटकरे सोबतच्या पक्षांना कितपत सोबत घेऊन चालणार ..?स्थापित समन्वय समिती च्या बैठका तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा देणार का..??हे देखील आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.





