सावंतवाडी : दिव्यांग व्यक्तींना सहाय्यता निधी वितरित करण्यात विलंब होत आहे. नगरपरिषदेने येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर सदर दिव्यांग लाभार्थ्यांना हक्काचा निधी वितरित करावा, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. सावंतवाडी शहरातील दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदेच्या बजेटच्या पाच टक्के रक्कम ही वितरित करत असते. यावर्षी दिव्यांग व्यक्तींना निधी अजून मिळालेला नाही. बराच विलंब होत आहे, तरी येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर सदर दिव्यांगांचा हक्काचा निधी वितरित करावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
Home ब्रेकिंग न्यूज दिव्यागांना त्यांच्या हक्काचा निधी दिवाळी आधी वितरण व्हावा.! – माजी नगराध्यक्ष बबन...





