वॉशिंग्टन : अमेरिकेतील लेविस्टन शहरात एका व्यक्तीनं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आलीये. यात डझनभर लोक गंभीररित्या जखमी झालेत, तर गोळीबारात 50 ते 60 जण जखमी झाल्याची माहिती आहे. यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सक्रिय शूटरनं बुधवारी रात्री हा गोळीबार केलाय.
There is an active shooter in Lewiston. We ask people to shelter in place. Please stay inside your home with the doors locked. Law enforcement is currently investigating at multiple locations. If you see any suspicious activity or individuals please call 911. Updates to follow. pic.twitter.com/RrGMG6AvSI
अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयानं संशयिताचे दोन फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. लेविस्टन पोलिसांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, ते लेविस्टनमध्ये सक्रिय शूटरसंदर्भात काळ्या रंगाचे फ्रंट बंपर असलेल्या वाहनाचा शोध घेत आहेत.
मेन स्टेट पोलिसांनी सीएनएनला याबाबत सांगितलंय की, ते संशयिताच्या कारचा शोध घेत आहे. तर केंद्रानं सांगितलं की, ते रुग्णांना दाखल करण्यासाठी प्रादेशिक रुग्णालयांशी समन्वय साधत आहेत. लेविस्टन हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे.
मेनच्या गव्हर्नर जेनेट मिल्स (Maine Governor Janet Mills) यांनी बुधवारी रात्री सांगितलं की, मला या परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. लेविस्टनमधील सक्रिय शूटर्सचा आम्ही शोध घेत आहोत. मी परिसरातील सर्व लोकांना राज्य आणि स्थानिक अंमलबजावणीच्या निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. मी या परिस्थितीचं निरीक्षण करत असून सार्वजनिक सुरक्षा अधिकार्यांच्या जवळच्या संपर्कात राहून माहिती जाणून घेत आहे, असं त्यांनी म्हटलंय.





