छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठा समाजाला आरक्षण देणार.! ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही.

30

मुंबई : मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दसरा मेळव्यात मोठं वक्तव्य केलं. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठा आरक्षण देणारच, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दसरा मेळाव्यात दिला. कुणावरही अन्याय न करता. कुणाचंही आरक्षण काढून न घेता. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणारं. एकनाथ शिंदेच्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार, सर्व समाजबांधव आपले आहेत.

मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने, शपथ घेऊन, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सांगतो. मी मराठा समाजाला आरक्षण देणार, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत आज संपली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.