मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी सत्तारांची फिल्डिंग! ; २०० एसटी बसेस केल्या बुक.

12

छत्रपती संभाजीनगर : राज्यात उद्या दसऱ्याच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेकडू दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे शिवजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील मुंबईतील आझाद मैदानावर मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईत होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी एसटी महामंडळाच्या दोनशे बसगाड्या बुक केल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली. आज सोमवारपासून (ता. २३) या बस मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळावा होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. यासाठी राज्यभरातून शिवसैनिक व सर्वसामान्यांना मुंबईत घेऊन जाण्याची जबाबदारी अनेक मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे.