धर्मशाला : येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 21 वा सामना खेळला गेला. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. कारण, दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता. सामन्यादरम्यान संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. मैदानावर या सामन्याची क्रेझ सुरू असतानाच, ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवर विक्रमी संख्येने लोकांनी हा शानदार सामना थेट पाहिला. या वर्ल्ड कपच्या सामन्याने प्रेक्षकसंख्येचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले.
हॉटस्टारवर 3.5 कोटींहून अधिक लोक भारत-न्यूझीलंड सामना एकाच वेळी पाहत होते. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा खेळत होते, तेव्हा विक्रमी 4.3 कोटी प्रेक्षक सामना पाहत होते.
भारत-न्यूझीलंड सामन्यात भारत-पाकिस्तान सामन्याचा विक्रम मोडला गेला. त्याच महिन्यात, 14 ऑक्टोबरला 3.5 कोटी लोकांनी हॉटस्टारवर भारत-पाकिस्तान सामना पाहिला होता. यापूर्वी आशिया कप 2023 मध्ये 2.8 कोटी लोकांनी ऑनलाइन सामना पाहिला होता. जागतिक सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. याशिवाय चाहते डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. विक्रमी 4.3 कोटी लोकांनी भारत-न्यूझीलंड सामना डिस्ने प्लस हॉटस्टार अर्थात OTT वर थेट पाहिला. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी क्रिकेटचा सामना लाइव्ह पाहिला नव्हता. आशिया कप 2023 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेला सुपर फोर सामना 2.8 कोटी लोकांनी थेट पाहिला होता.




