परफेक्ट अकॅडेमीत सरस्वती पूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न..!

173

सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण कोकण आणि गोव्यात जेईई, नीट, सीईटी अशा महत्वपूर्ण परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करण्यात अव्वल स्थानावर असलेल्या परफेक्ट अकॅडेमीच्या सिंधुदुर्गनगरी येथील शाखेत सरस्वती पूजन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब आणि संचालिका अंकिता परब यांच्या मार्गदर्शनानुसार सरस्वती पूजनाचा कार्यक्रम दिमाखदारपणे संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित असलेले सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. आर. परब व सौभाग्यवती पार्वती परब यांच्याहस्ते प्रथम सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध प्रकारचे आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न झाले.

यावेळी अकॅडेमीचे मॅनेजर अक्षय कानडे यांनी स्वतः विविध मान्यवरांच्या साथ संगतीने संगीतमय असे भजन व अभंग सादर करत जल्लोषपूर्ण वातावरणात सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी अकॅडेमीच्या को-ऑर्डिनेटर श्रद्धा चव्हाण, कौन्सिलर ओमकार मांजरेकर, अकाउंटंट आशिष सावंत तसेच परफेक्ट अकॅडेमीचे शिक्षक किंबर्ली शर्मा, सुरज कुमार, ईबराज खान, सचिन मिश्रा, रजत भारती आणि अकरावी व बारावीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

दरम्यान दरवर्षी अकॅडेमीत अशाच पद्धतीने उत्साहपूर्ण आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सरस्वती पूजन साजरे केले जात असल्याचे चेअरमन प्राध्यापक राजाराम परब यांनी सांगितले.