‘सायबर गुन्हे’ बाबत विद्यार्थ्यांना दिल्या टीप्स.
कणकवली : विद्यामंदिर माध्यामिक प्रशालेत कणकवली पोलीस स्टेशनचे उपनिभागीय अधिकारी राजेंद्र गाडेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी किशोर वयातील मुलांच्या मानसिकेत कोणता बदल करण्यात येईल? या विषयी सायबर गुन्हे व कायदे या विषयी मार्गदर्शन करून उद्बोधन केल.
यावेळी सायबर गुन्हे व मोबाईल यांचा वापर करून बाल जगताला कसे फसविले जाते त्यांचे जाळे कसे देशभर पसरवून किशोरवयीन मुला मुलींच्या जीवन जगण्याचा आधार तोडला जातो याची परिपूर्ण माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गाडेकर यांनी कायद्याचा आधार घेऊन स्पष्ट केले. तसेच कणकवली परिसरात कोणत्या स्वरूपात सायबर गुन्हे वाढत आहेत?, याचे संगणकावर प्रत्यक्ष प्रातिक्षकासह पूर्ण माहिती सौ. रश्मी बाईत मॅडम यांनी दिली.
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणते उपाय असावे? यासंबंधी खूप महत्वाचे मार्गदर्शन रश्मी बाईत मॅडम यांनी विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थांना देऊन भावी आयुष्य सुंदर जगण्यासाठी प्रवृत्त केले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी. जे . कांबळे, पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव, पोलीस सहाय्यक श्री. घाडीगावकर तसेच प्रशालेत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ शिक्षक श्री. अच्युतराव वणवे सर यांनी केले. सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार श्री. वणवे सरांनी मानले व कार्यक्रमांची सांगता झाली .



