बांदा : बांदा पोलीस ठाणे यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेत सेक्युरिटी व सायबर जनजागृती अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे व समीर भोसले उपस्थित होते. त्यानी विद्यार्थी व विद्यार्थीशी सायबर क्राईम बाबत पॉवर पॉईंट सादर करून प्रत्यक्षात संवाद साधला. तसेच सायबर गुन्हे विषयी तपशीलवार माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यापासून कसे परावृत्त करता येईल, यांचे मार्गदर्शन केले.
दरम्यान, MKCLबांदाचे गणेश मालवणकर तसेच श्रीपाद शेटवे यांनी कॉम्पुटर इंटरनेट बाबत बेसिक माहिती देण्यात आली.





