सावंतवाडी : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात थाळी फेक स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी या प्रशालेची खेळाडू कु. सृष्टी बागेवाडी हिने प्रथम क्रमांक मिळवत विभागस्तरावर आपले नामांकन निश्चित केले आहे.
कु. सृष्टीचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





