इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामतेच्या शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ.!

99

देवगड : देवगड तालुक्यातील पेशवेकालीन इतिहासाची परंपरा लाभलेला शिस्तबद्ध शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते या संस्थांनच्या नवरात्र उत्सवाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त पेशवेकालीन इतिहासाची परंपरा जपत आजही त्याच दिमाखात सर्व कोटकामतेवासीय हा उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करताना दिसत आहेत. पूर्वापार पद्धतीने चालत असलेले देवीचे सेवेकरी या उत्सवासाठी राजस्थान जोधपूर तसेच कराड मधून आवर्जून या उत्सवासाठी मुक्कामी येतात.
यावर्षी रविवार १५ ऑक्टोंबर घटस्थापना पासून २४ ऑक्टोबर २०२३ विजयादशमी पर्यंत इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामतेच्या नवरात्र उत्सवाचा शाही थाट रंगणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोटकामते भगवती मंदिरात करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारापर्यंत अशा पद्धतीने कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळेल. यामध्ये दररोज काकड आरती श्रींची महापूजा गायनाची बैठक सनई चोपडा सनई वादन गायनाची बैठक सुश्राव्य भजने पुरणवाचन पालखी प्रदक्षिणा पानसुपारी सनई वादन कीर्तन श्रींचा संचार आधी कार्यक्रमांबरोबरच १५ ऑक्टों सदाशिव पाटील ,संदीप लोके ,१६ ते १८ ऑक्टोंबर स्नेहल दीप सामंत,१८ व १९ ऑक्टोंबर विनोद चव्हाण, मुकुंद क्षीरसागर राजस्थान जोधपूर,
२० ऑक्टोबर सौ राधा जोशी,
१९,२०,२१ गोविंद आसोलकर, २१ ऑक्टोंबर सुधांशू सोमण, अजित गोसावी, महेंद्र मेस्त्री, २२ ऑक्टोंबर अशोक हिंदळेकर, दुर्वास गुरव २३ ऑक्टोंबर कमलाकर पाटकर, श्रीधर मुणगेकर ,मंदार स्वाती अशोक चव्हाण आणि सहकारी यांचा शिवशाही मर्दानी आखाडा
सादरकर्ते शिवशाही विकास मंच कोल्हापूर याचा कार्यक्रम, याशिवाय मंगेश पाटकर ,गुरुनाथ पाटकर, तेजस पाटकर अनेक नामवंत स्थानिक कलाकार यांची कर्णमधुर भजने कीर्तने आधी भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामतेच्या शारदीय नवरात्र उत्सवाचा शाही थाट पाहण्याचा नेत्रदीपक सोहळा पाहण्याचे प्रत्यक्ष साक्षीदार व्हा असे आवाहन इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामतेचे विश्वस्त मंडळ, मानकरी वर्ग, देवसेवक, आणि समस्त कोटकामते ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.