Home क्रीडा कलंबिस्त हायस्कूलच्या श्रेया तावडेची जबरदस्त कामगिरी.! ; विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी उंच...

कलंबिस्त हायस्कूलच्या श्रेया तावडेची जबरदस्त कामगिरी.! ; विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी उंच उडीत करणार जिल्ह्याचे नेतृत्व.

271

सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त हायस्कूलची विद्यार्थिनी कु. श्रेया सुनील तावडे ही १७ वर्षांखालील मुलींच्या उंच उडी क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करीत सांगली येथे होणा-या विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या प्रशालेचे कर्तबगार क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे श्रेयाला सातत्याने उत्तम मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थाध्यक्ष श्री. शिवाजीराव सावंत, सचिव श्री. यशवंत राऊळ, सहसचिव श्री. चंद्रकांत राणे व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक अभिजीत जाधव, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे.