अहमदाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकली. असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचे पारडे जड
भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधल्या विश्वचषक सामन्यासाठी अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालंय. विश्वचषकाच्या रणांगणात भारत आणि पाकिस्तान संघांमधला सामना हा महामुकाबला मानला जातो. अवघ्या क्रिकेटविश्वात या सर्वाधिक उत्सुकता असलेला हा सामना असतो. या सामन्याला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरुवात होईल. विश्वचषकाच्या रणांगणावर आजवर भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सात सामने खेळवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्या सातपैकी सातही सामने भारतानं जिंकले आहेत. पण यंदाच्या विश्वचषकात भारताविरुद्धच्या अपयशाची मालिका खंडित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न राहिल. पाकिस्ताननं पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे नेदरलँड्स आणि श्रीलंकेला हरवून विश्वचषकात आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तर पाकिस्ताननं ३४५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याची हिंमतही दाखवली. त्याचवेळी भारतानंही ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला हरवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतलीय. भारतापाठोपाठ पाकिस्तान गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.





