बांदा : श्रीमती चंद्राबाई कल्लापा म्हेत्री चॅरिटेबल ट्रस्ट, हलकर्णी, कोल्हापूर आणि शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाच्या गोगटे – वाळके कॉलेज, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय माध्यमिक गट व आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आंतरमहाविद्यालयीन गटात पी. एन. पी. कॉलेज, अलिबाग, रायगडचा वेदांत दिलीप कंटक याने प्रथम क्रमांक मिळविला. तर शालेय माध्यमिक गटात नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली, सिंधुदुर्गची विद्यार्थिनी रेश्मा संदेश पालव ही प्रथम आली.
आंतरमहाविद्यालयीन गटात शिवराज कॉलेज, गडहिंग्लज, कोल्हापूरचा संकेत पाटील द्वितीय, कर्मवीर हिरे कॉलेज, गारगोटी, कोल्हापूरचा चैतन्य कांबळे हा तृतीय, तर गोगटे – वाळके कॉलेज, बांदा, सिंधुदुर्गचा विठ्ठल दळवी व जयवंतराव सावंत कॉलेज, पुणेचा संतोष शिंदे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले.
तसेच शालेय गट टोपीवाला हायस्कूल, मालवणचा विद्यार्थी कैवल्य मिसाळ द्वितीय, नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीची विद्यार्थिनी वैष्णवी वाडकर तृतीय, ओझर विद्यामंदिर, कांदळगावची रिया कांदळगावकर व कुडाळ हायस्कूल, कुडाळची विद्यार्थिनी श्रावणी आरावंदेकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. या स्पर्धेत एकूण ५७ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व श्रीमती चंद्राबाई कल्लापा म्हेत्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर म्हेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. शुभांगी धर्म, श्री. हरिहर वाटवे, श्री. प्रकाश तेंडोलकर व प्राचार्य डॉ.अरुण मर्गज यांनी केले. यावेळी संतोष शिंदे, पुणे, वेदांत कंटक, रायगड, सुनिधी मराठे, सावंतवाडी यांनी मनोगते व्यक्त केली. निकालाचे वाचन या स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर म्हेत्री, सचिव अनिल शिर्के, संयोजक प्रा. आर. एस. गावडे, प्रा. डॉ. एस. पी. वेल्हाळ, प्रा. रश्मी काजरेकर, प्रा. निरंजन आरोंदेकर, प्रा.डॉ. ए. पी. महाले, देणगीदार श्री. सुनील कांबळे, श्री.संजय शेवाळे, सौ.वर्षा माळी, प्रा. प्रसाद जाधव, प्रा. भूषण सावंत, श्री.अविनाश दुध्यागोळ व सर्व प्राध्यापक वृंदानी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी काजरेकर यांनी केले. तर आभार प्रा. निरंजन आरोंदेकर यांनी व्यक्त केले.





