सावंतवाडी : सावंतवाडी शहरात आंजिवडेतील युवकांसोबत घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केलेल्या मागणीनुसार तहसील कार्यालय सावंतवाडी येथे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी व सामाजिक संघटनांची बैठक पार पडली. यावेळी नगरपरिषद व महावितरणला शहरातील धोकादायक व जीर्ण झाडांचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. तर मंगेश तळवणेकर यांनी झाड पडून दूर्दैवी मृत्यू झालेल्या पंदारे कुटुंबाला शासनाकडून मदत देण्यासह त्यांच्या कुटुंबीयांना दोन सदस्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, शासनाने ‘त्या’ मृत युवकांची किंमत ५ लाख करू नये, युवकांच्या वारसदारांना न्याय द्यावा, त्यांच्या भावनांशी खेळू नये, असेही मंगेश तळवणेकर यांनी सांगितले.





