मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि.१४ ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं १४१व अधिवेशन मुंबई येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
ऑलिम्पिक समितीच हे अधिवेशन मुंबईतील जिओओल्ड सेंटरमध्ये १४ ते १७ ऑक्टोबर या दरम्यान पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनात स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित राहणार आहे.
भारतात तब्बल ४० वर्षांनंतर ऑलिम्पिक अधिवेशन पुन्हा भारतात होत आहे. याआधी १९८३मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी अधिवेशन पार पडलं होतं. मुंबईतील अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्य़क्ष थॉमस बच आणि आयओसीच्या भारतातील सदस्य निता अंबानी यांचं स्वागत केलं.
ऑलिम्पिकचं १४१वं अधिवेशन भारतात होत आहे ही भारतीय क्रीडा विश्वासाठी महत्वाची गोष्ट आहे. यामुळे भारताला आगामी काळात अनेक स्पर्धांचं यजमानपद भुषवण्यासाठी संधी मिळू शकते. याबाबत केंद्रीय अनुराग ठाकुर यांनी देखील माहिती दिली आहे. २०३६ची ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हावी यासाठी भारत दावा करु शकतो.





