अभिनंदनीय – आसोली फणसखोल शाळेतील रोहन गावडेची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड.!

101

सावंतवाडी : जि. प शाळा आसोली फणसखोल शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु. रोहन स्वप्नील गावडे याची जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली (केंद्रिय बोर्ड) ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे निवड झाली आहे. या शाळेतून तो निवड परीक्षेसाठी प्रविष्ठ झाला होता. त्याची जिद्द, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळे त्याला हे यश प्राप्त झाले आहे. दुर्गम भागातील एका विद्यार्थ्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. कु. रोहनचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विनोद गावडे, मुख्याध्यापक व मार्गदर्शक श्रीम. सुजाता देसाई मॅडम व शिक्षक श्री. प्रसाद गावडे सर यांनी त्याचे अभिनंदन केले. पालक ग्रामस्थ व सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.