शिरोडा येथील ‘अमृत कलश यात्रे’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.! ; पंचायत समिती वेंगुर्ला, ग्रामपंचायत शिरोडा यांचे संयुक्त आयोजन.

62

वेंगुर्ला : ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत पंचायत समिती वेंगुर्ला आणि ग्रामपंचायत शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोडा येथे आज काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील सर्व गावा मधून आलेल्या अमृत कलशा मधील माती एकत्र करून ‘अमृत कलश यात्रा’ शिरोडा गावातून काढण्यात आली. त्यानंतर हा कलश वेंगुर्ले पंचायत समितीच्या स्वाधीन करण्यात आला.
शिरोडा येथील या यात्रेमध्ये शाळेतील विद्यार्थी यांनी राष्ट्रगीत, समूहगीत, पथनाट्य सादर केले.तसेच अंगणवाडी सेविका यांनी लेझिम नृत्य सादर केले. शिरोडा माऊली मंदिर प्रांगणात प्रथम सर्व कलश एकत्र करण्यात आले. यावेळी
पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सौ. पूनम राणे, शिरोडा सरपंच सौ. लतिका रेडकर, माजी आमदार शंकर कांबळी, माजी उपसभापती सिद्धेश परब तसेच वेंगुर्ला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगट, विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पालक, ग्रामस्थ सहभागी झाले होते. शिरोडा गावातून ही यात्रा काढण्यात आली.यावेळी गटविकास अधिकारी आणि शिरोडा सरपंच यांनी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.