सावंतवाडी पंचक्रोशीतील युवकांचा मनसेत जाहीर प्रवेश.! ; माजी आमदार उपकरांनी केले स्वागत.

43

सावंतवाडी : सावंतवाडी शहरासह पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी आज मनसे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्याहस्ते मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसेचे सावंतवाडी माजी शहराध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली आज श्री. उपरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत पदाधिकाऱ्यांचे मनसेत स्वागत करण्यात आले. यात स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गांवकर नितीन गावकर, ओंकार गांवकर, अतुल गांवकर, ज्ञानेश्वर नाईक, विशाल बर्डे आदींनी मनसेत प्रवेश केला.