BIG BREAKING – राज ठाकरेंविरोधात तक्रार देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात.!

77

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी अॅड.  गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलविरोधात हाक दिली आहे. त्यांनी अवाजवी टोल वसुलीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. विशेष म्हणजे पनवेल, वाशी, मुलुंड या टोलनाक्यांवर मनसैनिक ठाण मांडून आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक वाहनांना टोल न भरु देता सोडून दिलं. याच मुद्द्याच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सदावर्ते मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. ते काय तक्रार देतात आणि राज ठाकरेंच्या टोल आंदोलनाला कसा विरोध करतात, हे पाहावं लागेल.