सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस यांच्यावर आज अंत्यसंस्कार.! ; १२ ऑक्टोबर रोजी शोक सभा.

40

सावंतवाडी : सिंधुदुर्ग माजी सैनिक संघटना, स्कूल तसेच सैनिक पतसंस्थेचे संस्थापक सहकाररत्न पी. एफ. डॉन्टस  यांचं शनिवारी रात्री निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम आज सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी खालील प्रमाणे होणार आहे.
०८:३० धार्मिक विधी
०८:४० सैनिक स्कूल कॅडेट्सकडून सैनिकी परंपरेने पुष्पचक्र अर्पण
०९:०० अंत्ययात्रा मार्गस्थ
१०:०० सिमेट्री येथे मिसा (प्रार्थना)
१०:३० विविध संघटना, संस्था व मान्यवरांकडून पुष्पांजली
११:०० सैनिक स्कूल कॅडेट्सकडून सॅल्युट.
११:१५ अंत्यसंस्कार.
दिनांक १२/१०/२०२३ गुरुवार रोजी नवसरणी येथे सकाळी ११:०० वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती त्यांच्या आप्त स्वकीयांकडून देण्यात आली आहे.