कोलगावात बालकाला कुत्र्याचा चावा.! ; कुत्र्यांची नसबंदी करावी, राजू मसुरकर यांची मागणी.

625

सावंतवाडी : अक्षय महेश धुरी (राहणार धुरीटेंब कोलगाव, सावंतवाडी ) या बालकाला घरामध्ये ओट्यावर बसलेला असताना भटका कुत्रा येऊन पायाच्या मांडीला चावा घेतला. त्याच्या वडीलांनी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करून इंजेक्शन व औषधे व उपचार घेतला. मात्र या घटनेमुळे सावंतवाडी तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. आज समाजात पाळीव कुत्रा प्रेमी नागरिक बरेच असल्याने अशा प्रकारचे कुत्रा पाळत असताना याची दखल घ्यावी. मध्यंतरी मळगावमध्ये एकाच घरातील सात जणांना पाळीव कुत्रा चावल्याने त्यांनी अशाच प्रकारचा चावा कुत्र्याने घेऊन मानसिक व शारीरिक तास झाला. आज जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे पाळीव कुत्रे तसेच भटके कुत्रे यांचे प्रमाण वाढले असून या कुत्र्यांची नसबंदी करून घेतली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी तशा प्रकारचे निर्देश व आर्थिक तरतूद बजेटमध्ये करून सर्वसामान्य नागरीक, बालके, वृद्ध व महिला तसेच शालेय विद्यार्थी यांना या भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण करण्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करून घेतली पाहिजे. काही दिवसांनी हा प्रकार न थांबल्यास कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊन दिवसेंदिवस लोकांचे जीव जाण्याचे प्रकार वाढणार आहेत, अशी प्रतिक्रिया जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.