राष्ट्रवादीच्या बाबतीत ‘एक घाव दोन तुकडे’ होणार.! ; निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार नाही, अंतिम निर्णयच देणार.

61

मुंबई : राष्ट्रवादीच्या प्रकरणात निवडणूक चिन्ह गोठवले जाणार नाही, निवडणूक आयोग तात्पुरता निर्णय न देता अंतिमच निर्णय देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेप्रमाणे या ठिकाणी आधी तात्पुरता आणि मग अंतिम निर्णय असं होणार नाही. त्यामुळे एका गटाला घड्याळ चिन्ह आणि नाव मिळणार तर दुसऱ्या गटाला पक्षासाठी नवीन चिन्ह आणि नवीन नाव शोधावं लागणार आहे.