आमच्याकडे शेकडो क्षेपणास्त्रे आहेत.! ; पुतिन यांनी दिला युक्रेनवर आण्विक हल्ल्याचा इशारा.

45

मॉस्को : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन युद्ध आता निर्णायक वळण घेईल असे पहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी रशियाने एक शक्तिशाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचे सांगितले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीचे काम जवळजवळ पूर्ण केले आहे. जो त्या नवीन पिढीतील अयावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीचे काम जवळजवळ पूर्ण केले आहे. जो त्या नवीन पिढीतील अडवस्त्रांच्या चाचण्यांचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे अणुआस्त्रांच्या चाचण्यांचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे.

24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनगर रशियाने आक्रमण केले. त्यानंतर वेळोवेळी पुतीन त्यांच्याकडे असलेल्या क्षेपणास्त्रांविषयी व परमाणु वस्त्रांविषयी बोलत आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्या कोणत्या व्यक्तीकडे अक्कल असेल ती व्यक्ती कधीही रशियाच्या विरोधात अणुआस्त्र वापरणार नाही.

विश्लेषकांच्या मते रशिया किंवा अमेरिकेद्वारे अणुचाचणी पुन्हा सुरू करणे अशावेळी अत्यंत वाईट असणार आहे. कारण सध्या पाहायला गेलो तर दोन्ही देशांमधील तणाव गेल्या 60 वर्षांतील सर्वोच्च आहे.