जिल्हास्तरीय बाल बॅडमिंटन स्पर्धेत कुडाळ हायस्कूलची अव्वल कामगिरी.! ; विभाग स्तरासाठी दोन संघांची निवड.

72

कुडाळ : जिल्हास्तरीय बाल बॅडमिंटन स्पर्धेत कुडाळ हायस्कूलची दमदार कामगिरी झाली आहे. विभाग स्तरासाठी दोन संघांची निवड झाली आहे. 19 वर्षे गट मुलगे, मुली -विजयी 17 वर्ष गट मुली- उपविजयी व मुलगे- तृतीय क्रमांक 14 वर्ष गट मुलगे – उपविजयी व मुली- तृतीय क्रमांक.

क. म. शि. प्र. मंडळ.कुडाळ हायस्कूल जुनियर कॉलेजचे संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक दिनेश आजगावकर, ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक राजकिशोर हवळसर व पर्यवेक्षक ठाकूर सर, भोगटे सर व नाईक सर यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा विभाग प्रमुख विजय मयेकर, रामचंद्र खाकर, सिद्धार्थ बावकर, वैभव कोंडस्कर व सचिन पाताडे यांनी केले.