डी एड बीएड बेरोजगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…!

सिंधुदुर्गनगरी : डी एड बीएड बेरोजगार यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले असून आमची मुख्य मागणी अशी आहे की टी ई टी ची परीक्षेत वारंवार होणारे गैरप्रकार, त्या पेपर मध्ये निघणाऱ्या चूका, राजकीय प्रशासकीय हस्तक्षेप आणि जो काही मोठा घोटाळा उघड झाला आहे.

त्यामुळे आम्हाला या परिक्षेवर विश्वास राहिला नाही. तरी जे पात्र ठरलेले आहेत त्यांच्यावर पण संशय आहे. जे सरसकट डिएड बेरोजगार दहा वर्षापासून प्रतीक्षेत आहेत त्यांना अभियोग्यता चाचणी त बसण्याची परवानगी मिळावी जे कोण मेरिट वर सेवेमध्ये येतील त्यांना पाच वर्षाची मुदत द्या. तुम्ही टी ई टी परीक्षा पात्र होण्यासाठी जेणेकरून जे कोण वंचित राहतील त्यांना संधी मिळेल आणि कोणावर अन्याय होणार नाही.