राकेश परब यांना ‘विद्यार्थी मित्र’ पुरस्कार प्रदान.! ; नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांचा पुढाकार.

49

बांदा : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली २३ वर्षे देत असलेल्या योगदान बद्दल बांद्याच्या व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मधील मल्टी स्किल फाऊंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाचे तंत्रशिक्षक राकेश परब यांना ‘विद्यार्थी मित्र’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. नुकताच कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राकेश परब यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहदेव धर्णे, अमित केरवडेकर,जोवेल डिसिल्वा, बापू परब, संजय पिळणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी राकेश परब यांना ‘पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शैक्षणिक, सामाजिक,कार्यात त्यांनी नेहमीच योगदान दिले आहे.