सावंतवाडी : जागतिक ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक १ आॅक्टोबर २०२३ रोजी शिवप्रेमी ग्रुप आजगांव – धाकोरे, ता. सावंतवाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आजगांव, ता. सावंतवाडी येथील पूर्ण प्राथमिक केंद्रशाळेमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या रक्तदान शिबिराला आजगांव सरपंच यशश्री सौदागर, उपसरपंच सुशील कामटेकर, मा. सरपंच सूप्रिया मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य अनंत पांढरे (शिवप्रेमी ग्रुप), ग्रा. पं. सदस्या वर्षा रेवाडकर, ग्रा. पं. सदस्या सेजल रेडकर, शिवप्रेमी ग्रुप आजगांव-धाकोरे चे प्रसाद मेस्त्री, बाळकृष्ण हळदणकर, शिक्षक अनिल गोवेकर, दत्तगुरु कांबळी, सुनिल वाडकर, राजू शेणई, आजगांव ग्रामसेवक संदीप गवस, भूषण मांजरेकर, श्री. चीपकर, सिद्धार्थ पराडकर, बाबली गवंडे तसेच आजगांव-धाकोरे ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याचबरोबर सावंतवाडी रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ एडके, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, राहूल जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी उपसरपंच सुशिल कामटेकर, ग्रा. पं. सदस्य अनंत पांढरे, संजय वाडकर, सुनिल वाडकर, प्रतीक भगत, संदीप पांढरे, भाऊ रेवाडकर, सचिन बाळे, गजानन पांढरे, संकेत वाडकर, गुरुनाथ गवंडे, स्वप्निल आरोंदेकर, प्रसाद मेस्त्री, बाळू हळदणकर तसेच इतरही शिवप्रेमी ग्रुप आजगांव-धाकोरेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
यावेळी ज्येष्ठ रक्तदाता सुनिल वाडकर यांनी विक्रमी तब्बल शेहेचाळीसव्या वेळी रक्तदान केले तर भूषण मांजरेकर यांच्या प्रयत्नांनी निखिल तानावडे यांनी बांद्याहून येऊन तर जयदीप पडवळ यांनी शिरोड्यातून येऊन रक्तदान केले. तसेच उपजिल्हा रुग्णालयात एका गरोदर भगिनीला ओ निगेटीव्ह रक्तगटाची आवश्यकता असल्याने आमच्या विनंतीला मान देऊन आजगाव-भोमवाडी येथील निकेत बाळे यांनी रक्तदान केले. रक्तदान करणार्या एका रक्तदात्याच्या स्वरुपात एक ‘ए निगेटीव्ह’ रक्तदाता आढळला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ममता जाधव यांनी केले तर आभार माजी सरपंच सुप्रिया वाडकर – मेस्त्री यांनी मानले.





