सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुधीर राऊळ मित्र मंडळ, मळगाव आणि सहाय्यक लॉरेन्स अँड मेयो सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार १ ऑक्टोंबर २०२३ रोजी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे ठेवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला.
सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या या मोफत नेत्र तपासणी शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकांनी आपल्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी नेत्र तपासणी शिबिराला येऊन आपल्या डोळ्याचे निदान केल. एकूण 143 जणांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमास मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर, प्रशालेचे चेअरमन मनोहर राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, अॅड. राजू कासकर, सतीश आकेरकर, माजी तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे, मळगावचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी सिद्धेश तेंडुलकर, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, दाजी सावंत, सुभाष नाटेकर, सुखदेव राऊळ, पंढरीनाथ गावकर, तुषार वालावलकर, योगेश चिंदरकर, ठाकूर, भजन दशावतार हार्मोनियम वादक बुवा संकेत कुडव, शतायु जांभळे, राकेश परब, साहिल तळकटकर, ओमकार नवार, महेंद्र कांबळी, सिद्धेश सावंत, केतन सावंत, अजित पोळजी, सुदेश राऊळ, अनिकेत दळवी, तुषार पोळजी, प्रथमेश राणे, अक्षय माळकर, संदीप राऊळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.





