मुंबई विमानतळाबाहेर CISF जवानाला ‘बीएमडब्लू’ने उडवलं.! ; १९ वर्षीय मुलगा ताब्यात.

51

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चेकपॉईंटवर बीएमडब्लू कारने CISF जवानाला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या अपघातानंतर कार चालवणाऱ्या १९ वर्षीय मुलाला सहार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात CISF जवान राहुल शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. राहूल शर्मा सध्या आयसीयूमध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सीआयएसएफचे अधिकारी शर्मा हे त्यांच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरील पोस्टवर ड्युटी करत होते. त्यावेळी कारने त्यांना धडक दिल्याचा प्रकार घडला. सहार पोलिसांनी भा. दं. वि. कलम 279, 338 आणि मोटार वाहन कायदाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवल आहे.