कोकण रेल्वे विस्कळीत..! ; त्रासलेल्या चाकरमानी बांधवांसाठी ‘मनसे’ सिंधुदुर्गचा आपुलकीयुक्त दिलासा.!

59

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मनसे नेते शिरीष सावंत, निरीक्षक संदीप दळवी, गजानन राणे यांच्या सूचनेनुसार कोकण रेल्वेला पनवेल येथे अपघात झाल्याने वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे ७ ते ८ तास अडकून पडलेल्या चाकरमानी बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे एक आपुलकीचा मनसे दिलासा म्हणून पोहे व चहाचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव, एसटी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, माजी मनविसे उपजिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य देवबाग पास्कल रॉड्रिक्स, विष्णू मस्के,अतुल पांगुळ, नफीस शेख, समीर मुजावर, अनिस शहा, संदिप गोसावी, विजय गुप्ता आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.