सावंतवाडी : सावंतवाडी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेव तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी नामदेव तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी सहदेव राऊळ यांची बिनविरोध निवड पार पडली. यात महिला उपाध्यक्ष पदी लीना प्रभु, सरचिटणीस श्रीधर राऊळ, सहसरचिटणीस आदम शहा, कोषाध्यक्ष श्रीरंग जाधव, महिला संघटक भारती चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख सोमा राऊळ, कायदेविषयक सल्लागार राजेश परब यांची नियुक्ती करण्यात आली. या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मधुकर घाडी, निरीक्षक म्हणून श्री. बागायतदार यांनी काम पाहिले.








