सावंतवाडी : मळेवाड नाईकवाडी येथील पेपर एजंट राधाकृष्ण काशिनाथ नाईक (वय वर्षे 75) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. राधाकृष्ण नाईक हे गेले कित्येक वर्ष पानपट्टी व्यावसायिक म्हणून काम करत असताना पेपर एजंट म्हणून त्यांनी आपला नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या निधनाने मळेवाड गावातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.





