सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात अकरा दिवसाच्या गणपतीचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले.टाळ्यांचा गजर,तबल्याची साद आणि सुमधुर आरतींचा जागर यामुळे विसर्जन स्थळावर उत्साहदाहक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयघोष करत आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तांनी निरोप दिला.








