सांगली : संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाची धामधूम पाहायला मिळत असताना एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तलावात बुडून ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तीन मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे.
देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) व वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) अशी त्यांची नवे आहेत.तिघेही मुलं पोहायला पाझर तलावात गेले होते. मात्र यावेळी पाण्याचा आंदाज न आल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. देवानंद व बालाजी हे दोघेही सख्खे भाऊ होते तर वैभव हा आई – वडिलांचा एकूलता एक मलगा होता. मुले बुडाली आहेत, ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्या सारखी पसरली. यावेळी त्यांना शोधण्यासाठी सर्वच लोक तलावाच्या दिशेने धावले. अखेर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक गणेशराव सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, बीट जमादार प्रभाकर गुडमलवार यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककाळा पसरली आहे.





