स्मरण पर्यटन चळवळीतील कार्यकर्त्याचं.! ;  आज सायंकाळी डी. के. सावंत यांच्या घरी कार्यक्रम, उपस्थित राहण्याचे आवाहन.

45
  • सावंतवाडी :  आज २७ सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिन. सिंधुदुर्ग जिल्हा या भारत वर्षातील पहिला पर्यटन जिल्हा, ज्याची अधिकृत घोषणा १९९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी यांनी केली. मात्र ही घोषणा कागदावरचं राहिली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या श्रेयवादाच्या खेळात पर्यटनाच्या द्रुष्टीने दखलपात्र कोणत्याही प्रकारची पूर्तता झाली नाही.
    आजच्या घडीला कोणीही कितीही पर्यटन विकासाच्या गप्पा मारो पण या जिल्ह्यातील या चळवळीचे खरे पायोनियर आहेत आमचे सर्वांचे लाडके मिञ स्व. डि. के. सावंत. जागतिक पर्यटन दिनाचा विसर शासकीय यंञणेला पडला पण दरवर्षी स्व. डी. के. सावंत पदरमोड करून मोठ्या प्रमाणात सोहळ्याचे नियोजन करायचे. पर्यटन हा त्यांचा श्वास होता. आपलं सारं आयुष्य त्यांनी या चळवळीसाठी झोकून देऊन काम केलं.
    आज दिनांक २७ संप्टेंबरला सायंकाळी ठिक पाच वाजता त्यांच्या मिञमंडळीच्या वतीने डी. के. रेसिडेन्सी, माजगाव येथे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून स्व. डी. के. सावंत यांचे स्मरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी कृपया आपण वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन निमंत्रक,  स्व. डी. के. सावंत, मित्रमंडळ यांनी केले आहे.