अवघ्या ९ बॉलमध्ये फिफ्टी! ; नेपाळच्या दिपेंद्र सिंगने मोडला युवराज सिंगचा रेकॉर्ड.

112

हांगझोऊ : नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरी या खेळाडूने एशियन गेम्समध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड आता दिपेंद्रच्या नावावर झाला आहे. अवघ्या 9 बॉलमध्ये फिफ्टी करून त्याने भारताच्या युवराज सिंगचा रेकॉर्डही मोडला आहे.

काल (27 सप्टेंबर) एशियन गेम्समध्ये नेपाळ विरुद्ध मंगोलिया टी-20 मॅच सुरू होती. या मॅचमध्ये नेपाळने अगदी जबरदस्त कामगिरी केली. नेपाळने मंगोलिया विरोधात 314 धावांचा डोंगर उभारला. टी-20 प्रकारात कोणत्याही टीमने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 मध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडणारी नेपाळ पहिलीच क्रिकेट टीम ठरली आहे.

फास्टेस्ट फिफ्टी –

नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरीने अवघ्या नऊ बॉलमध्ये फिफ्टी करून, भारताच्या युवराज सिंगचा 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. युवराजने 2007 साली झालेल्या T-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरोधात सर्वात फास्ट फिफ्टी केली होती. दिपेंद्र दहाच चेंडू खेळला, मात्र यामध्ये त्याने आठ षटकार मारले. तो 52 धावांवर नाबाद राहिला.

नेपाळच्या खेळाडूचं पहिलं शतक –

नेपाळच्या कुशल मल्ला याने 34 बॉलमध्ये शतक ठोकलं. टी-20 क्रिकेटमध्ये सेंच्युरी करणारा कुशल हा नेपाळचा पहिलाच क्रिकेटर ठरला.