‘एकच मिशन, जुनी पेन्शन.!’, ‘अखिल’चा एल्गार दुमदुमला.! ; भारत पेन्शन यात्रेचे सिंधुदुर्गात जोरदार स्वागत, ओरोसला सभा संपन्न.

148

प्रा. रूपेश पाटील ..

सावंतवाडी : ‘एकच मिशन, जुनी पेन्शन..!’ असा जोरदार नारा देत भारत पेन्शन यात्रेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात आले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने शेकडो शिक्षक बांधवांनी बांदा येथे उपस्थित राहून पेन्शन यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी संपूर्ण मुंबई गोवा हायवे ‘एकच मिशन, जुनी पेन्शन..!’ या नाऱ्याने निनादून गेला.

रविवारी सायंकाळी ६.०० वाजता बांदा येथे भारत पेन्शन यात्रेचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अखिलचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, काल सोमवारी सकाळी सावंतवाडीच्या जगन्नाथराव भोसले गार्डनकडून ओरोसपर्यंत भव्य पेन्शन रॅली निघाली व ओरोस येथे सदर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी ‘अखिल’चे  राष्ट्रीय स्तरावरून आलेल्या पदाधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष देविदास बसवदे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पी. हरिगोविंद, कार्याध्यक्ष दक्षिण विभाग  बसवराज धुरीकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला सेल रमादेवी, राष्ट्रीय महिला सक्रेटरी सीमा माथुर, दिल्ली राज्य संयुक्त चिटणीस नवीनकुमार, कर्नाटक राज्य सरचिटणीस नागराज यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. या सर्व नेते, पदाधिकार्‍यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

राज्य सल्लागार प्रकाश दळवी, राज्य कोषाध्यक्ष  विनयश्री पेडणेकर, राज्य संयुक्त चिटणीस म.ल. देसाई, राज्य संघटक प्रशांत पारकर, अध्यक्ष राजाराम कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, के. टी. चव्हाण, गुरूदास कुबल, संजना ठाकूर, सीमा पंडित, मृगाली पालव, सर्व तालुका अध्यक्ष, सचिव व सदस्य उपस्थित होते. तसेच यावेळी  मोठ्या संख्येने अखिलचे शिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.