बांदा येथे ‘अखिल’च्या भारत पेन्शन यात्रेचे भव्य स्वागत.! ; आज सावंतवाडीपासून ओरोसपर्यंत भव्य पेन्शन रॅली मार्गस्थ.

135

सावंतवाडी : काल रविवारी सायंकाळी६.०० वाजता बांदा येथे भारत पेन्शन यात्रेचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अखिलचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते.

तर सदर यात्रेचा काल मुक्काम सावंतवाडी येथे होता.

 

दरम्यान, आज सकाळी सावंतवाडीच्या जगन्नाथराव भोसले  गार्डनकडून ओरोसपर्यंत भव्य पेन्शन रॅली निघाली आहे. यावेळी  मोठ्या संख्येने अखिलचे शिक्षक, पदाधिकारी उपस्थित होते.