पुणे : कल्याण – अहमदनगर मार्गावर एका भरधाव कारने पाच शेत मजुरांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण-अहमदनगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे हद्दीत झालेल्या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना या पाच मजूरांना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी (एम एच १२ व्ही क्यू ८९०९) या गाडीने उडवले.









