सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेमध्ये कार्यालयीन साफसफाई करून ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतची स्वच्छता करण्यात आली
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम 24 सप्टेंबर 2023 रोजी राबविण्यात येत आहे. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, कर्मचारी सखाराम जाधव, सिद्धेश मुरकर,आपू शेळके, ग्रामस्थ जीजी कुंभार या सर्वांनी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाची साफसफाई करून स्वच्छता केली.









