प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न…!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालय येथे संपन्न झाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच अन्नपुरवठा मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग पोलीस, होमगार्ड, पोलीस बँड पथक, एनसीसी आणि स्काऊट गाईड पथकांनी संचालन केले.

विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा तसेच इतर गुणवंतांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री छोट्या मुलांबरोबर काही काळ रमले.