आदित्य ठाकरेंनी घेतले रुपेश राऊळ यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन..!

39

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सायंकाळी नेमळे देऊळवाडा येथे सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या घरी भेट दिली. यावेळी नेमळे येथील ग्रामस्थांनी आ. ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी ओवाळून त्यांचे औक्षण केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी रुपेश राऊळ यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपतीचे दर्शनही घेतले.

यावेळी भला मोठा झेंडू फुलांचा हार घालून ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आमदार ठाकरे यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू वस्तु देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, रुपेश राऊळ यांचे वडील गुरुनाथ राऊळ, आई वंदना राऊळ, भाऊ तुषार राऊळ, सौ. श्रेया राऊळ, सरपंच दिपाली बेहरे, उपसरपंच सखाराम राऊळ, शितल नानोस्कर, स्नेहाली राऊळ, आरती राऊळ, संज्योता नेमळेकर, जिल्हा समन्वयक रुची राऊळ, गितेश राऊळ, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, युवा तालुका समन्वय गुणाजी गावडे, विभाग प्रमुख सुनील गावडे, बाळा राहुल शाखाप्रमुख सचिन मुळीक, रवींद्र घोगळे रमामकांत राऊळ, शिवदत्त घोगळे, नगरसेवक अशोक सावंत आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.