संसदेत आज CAA संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता ; केंद्र सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत?

44

नवी दिल्ली : केंद्र सरकार पुन्हा CAA लागू करण्याच्या तयारी असल्याचं दिसून येत आहे. हा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासंदर्भात आज (बुधवारी) संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे समजले आहे.

२०१९-२०२०मध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात देशभरामध्ये रान उठलं होतं. दिल्लीसह अनेक मठ्या शहरांमध्ये आंदोलनं झाली. एनआरसीसंदर्भात तेव्हा कुठलीच कार्यवाही केंद्र सरकारने केलेली नव्हती. मात्र सीएएसंदर्भात बोलणी सुरु झालेली होती. आज बुधवारी त्याचं नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे.

मंगळवारी लोकसभेमध्ये महिला आरक्षणाचं विधेयक मांडण्यात आलेलं आहे. त्यावर आज चर्चा होणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळेल. सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येतंय की, बुधवारी सीएएसंदर्भात नोटिफिकेशन निघाल्यानंतर लगेचच जनगणनेच्या कामाला सुरुवात होईल.