रशिया-युक्रेननंतर आता ‘ह्या’ दोन देशांमध्ये सुरू झालं युद्ध..!

50

आर्मेनिया : एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याणं नाव घेत नाहीये, त्यातच आता आणखी दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) अझरबैजान देशाने आर्मेनियावर हल्ला केला आहे. दोन्ही देशांमध्ये यापूर्वीपासूनच भरपूर तणाव होता. मात्र आता याचं युद्धात रुपांतर झालं आहे. अझरबैजानने आता आर्मेनियाच्या नागोर्नो-काराबाख या भागामध्ये ‘दहशतवाद-विरोधी’ अभियान सुरू केलं असल्याचं देशाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं. या अंतर्गत काराबाख भागात केलेल्या हल्ल्यामध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे आर्मेनियाने याला शस्त्रसंधीचं उल्लंघन म्हटलं आहे. तसंच, अझरबैजानने मिसाईल-तोफांनी हल्ला केल्याचं आर्मेनियाने म्हटलं आहे.

युद्धाला फुटलं तोंड…

या प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धाला तोंड फुटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोन्हीकडून बेछूट गोळीबार केला जातो आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील 1990 च्या दशकात आणि 2020 साली या दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं होतं.

काराबाख क्षेत्रामुळे वाद..

आंतरराष्ट्रीय स्तरावर काराबाख हा भाग अझरबैजानच्या सीमेत येतो. मात्र, याठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्मेनियन लोकसंख्या असल्यामुळे आर्मेनिया देशाने यावर ताबा घेतला आहे. यामुळेच या दोन्ही देशांमध्ये कित्येक वर्षांपासून तणाव आहे.

दरम्यान, दोन्ही देशांनी हे युद्ध थांबवून चर्चेतून तोडगा काढावा, असं आवाहन अमेरिकेने केलं आहे.