विरोधकांनीही गायले मोदींचे गोडवे.! ; महिला खासदारांकडून निर्णयाचं स्वागत.

70

नवी दिल्ली : नुकतचं महिला आरक्षण विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात पारित कऱण्यात आलं. त्यानंतर मोदी सरकारच्या या निर्णयाचा सर्व पक्षाच्या महिला खासदारांनी स्वागत केलं आहे. देशातील महिलांचं उत्थान केल्याशिवाय देश बळकट होऊ शकत नाही. तसेच विरोधक पक्षांच्या महिला खासदारांनी देखील महिला आरक्षणावर घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं.

महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, “देशातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. महिलांचे उत्थान केल्याशिवाय लोकशाही बळकट होऊ शकत नाही. त्यामुळेच नवीन संसदेच्या पहिल्या सत्रात आम्ही महिला आरक्षण विधेयक मांडले.

महिला आरक्षण विधेयकावर भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “…महिला आरक्षण विधेयकासाठी आम्ही देशातील सर्व महिलांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जे विधेयक आणले आहे ते चांगल्यासाठी आहे. आपल्या सर्वांच्या. महिला आता पुढे जातील आणि देशासाठी आपली भूमिका बजावतील..!”

दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला, ज्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने एक दिवस आधी मंजुरी दिली होती. दरम्यान महिला आरक्षण विधेयक पारित झाल्यावर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाचा संघर्ष सुरु झालाय.

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी दावा केलाय की,  हे विधेयक काँग्रेसच्या काळात सादर करण्यात आलं होतं. याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.अतिशी म्हणाल्या की, “आम्ही त्याचे स्वागत करतो. या विधेयकाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेतही महिलांचे फार मर्यादित प्रतिनिधी आहेत, त्यामुळे निश्चितपणे आम्ही या विधेयकाचे स्वागत करतो.!”