नवी दिल्ली : जुन्या संसद भवनातून आता नव्या संसद भवनात सर्व कारभार स्थलांतरीत केला जाणार आहे. यासाठी जुन्या संसदेतील सेन्ट्रल हॉलमधून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जुन्या संसदेचं नवं नामकरणंही केलं, याला आता संविधान भवन म्हणून ओळखलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.






