तहसीलदार श्रीधर पाटील ॲक्शन मोडवर .! ; होडी, वाळूचा डंपर घेतला ताब्यात.

117

सावंतवाडी : आरोंदा सावरजुवे येथील खाडीपत्रात बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करणाऱ्या होळीवर सावंतवाडीत असेल तहसीलदार श्रीधर पाटील यांनी धडक कारवाई करत होडी आणि वाळूची वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेतला.
बेकायदा वाळू उपसा केल्या प्रकरणी सावंतवाडी आरोंदा-सावरजूवे येथे होडीसह वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी महसूल विभागाच्या माध्यमातून तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास केली. यात मुद्देमाल व गाडी मिळून अंदाजे १० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडीच्या महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यात सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह आंबोली तलाठी सुमित घाडीगावकर व आरोंदा तलाठी प्रविण पोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.