सावंतवाडी : भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी सिंधुदुर्ग भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांचे सुपुत्र प्रथमेश राजन तेली यांची नियुक्ती झाली आहे. प्रथमेश तेली यांची या पदाच्या निमित्ताने राजकारणात प्रदेश स्तरावरून थेट एन्ट्री झाली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा संघटनाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.







