देवगड : अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा पाया रचणारे भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस देवगड येथे देवगड तालुका अभियंता ठेकेदार संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त उपअभियंता ए. के. निकम कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
देवगड मधील सर्व शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील रुग्णांना यानिमित्त फळे वाटप करण्यात आले. अभियंता दिनानिमित्त दैनंदिनीचे प्रकाशनही करण्यात आले.
प्रशासकीय सेवेतील अभियंत्यांमधून सन 2023 साठीचा ‘आदर्श अभियंता पुरस्कार’ अनिल तांबे यांना प्रदान करण्यात आला. संघटनेतील सभासदांमधून विशेष कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. यामध्ये देवगड अर्बन बँकेचे नूतन संचालक समीर पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी देवगड तालुका अभियंता ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र माणगावकर, सरचिटणीस दिलीप कदम, रवींद्र चव्हाण, उपाध्यक्ष रणजीत जाधव, सुरज चव्हाण, मंगेश रजपूत, सौरभ हळदणकर, सदाशिव सरोळकर, राजीव डामरी, बिपिन कोरगावकर, प्रसाद कुलकर्णी, वैभव राणे, विशाल भुजबळ, गौरव कुलकर्णी, सर्वेश खवळे, अतिश गांगण, विष्णू शेळके ,शैलेश पाडावे , सौरभ साटम, हर्षवर्धन कदम, नितेश जाधव ,सौरभ कुलकर्णी, मयुरेश खाजनवाडकर, देविदास आईर, प्रसन्न कदम आदि उपस्थित होते.






